घराचे कुलुप तोडुन अज्ञात चोरट्याने केली ६५ हजारांची चोरी..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा कुलुप तोडुन अज्ञात चोरट्याने आत मध्ये प्रवेश करुन ६५ हजारांची चोरी केली आहे. हा प्रकार ६ डिसेंबर रोजी २ वाजता उघडकीस आला. याप्रकरणी अज्ञात चोरटया विरुध्द करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी विठ्ठल हरी कोल्हे (वय ६०) (रा.पांडे ता. करमाळा) यांनी करमाळा पोलिसात दिले असून त्यात त्यांनी म्हटले कि, माझा मुलगा हनुमंत हा पुणे येथे ६ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाचे सुमारास नोकरी करण्यासाठी गेला आहे. माझी पत्नी सौ.सविता भाजी विकण्यासाठी करमाळा येथे गेली होती, मी साधारण सकाळी ११ वाचे सुमारास करमाळा येथील सेतु कार्यालयात काम असल्याने मी आमचे राहते घराचे दरवाजाल्या कडीकोयंडा कुलुप लावुन गेलो होतो.
मी व माझी पत्नी सौ.सविता असे मिळुन माझा भाउ जगन्नाथ कोल्हे यांचे घरी कार्यक्रम असल्याने गेलो होतो. आम्ही दोघे ही साधारण दुपारी २ वा चे सुमारास कार्यक्रम संपल्याने आमचे राहते घरी आलो असता आमचे राहते घराचे दरवाजाचे कडीकोयंडा कुलुप तुटलेले दिसले. त्यावेळी आम्ही आमचे राहते घरामध्ये आत जावुन पाहिले असता घरातील लाकडी कपाटाचा दरवाजा उघडा दिसला तसेच लाकडी कपाटामधील लाकडी ड्राव्हर उघडलेले दिसले सदर लाकडी ड्राव्हर मध्ये आम्ही ठवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम हि दिसुन आली नाही.
त्यावेळी आम्ही सर्व वस्तुचा आजु बाजुला शोध घेतला असता ते मिळुन आली नाही. तेव्हा माझी खात्री झाली की, आमचे राहते घराचे दरवाजाचे कडी कोयंडा कुलुप तोडुन आत मध्ये प्रवेश करुन चोरी केली आहे.याप्रकरणी करमाळा पोलिसांनी अज्ञात चोरटया विरुध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
गेलेल्या मालाचे वर्णन खालीलप्रमाणे…1) 40,000 /- एक तोळा वजानचे गंठण 2) 20,000 /- एक अर्धा तोळयाची बोरमाळ 3) 5,000 /- रोख रक्कम असा एकूण = 65,000/- रुपये