तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये केम येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश
केम (प्रतिनिधी/संजय जाधव ) : जेऊर तालुका करमाळा येथे झालेल्या तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धेत कुस्ती या खेळात केम येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश संपादन केले आहे.
या मध्ये पुढील विद्यार्थ्यांनी यश मिळविले. १७ वर्षे वयोगटात शिवराज श्रीहरी तळेकर (८० किलो वजन) – प्रथम क्रमांक, प्रणव मारूती साबळे (६५ कि. वजन ) – प्रथम क्रमांक,अजय संभाजी कोळेकर (६० कि. वजन) – तृतीय क्रमांक मिळविला. १९ वर्षे वयोगटात सूरज नवनाथ कोळेकर (७४ कि.वजन) – प्रथम क्रमांक मिळविला आहे.
या खेळाडूना क्रिडा शिक्षक दादा अवताडे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन सुदर्शन तळेकर मुख्य ध्यापक अर्जुन रणदिवे,श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे सदस्य भाऊसाहेब बिचितकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. या शाळेचे केम परिसरातून कौतुक केले जात आहे.