आदिनाथ कारखान्यासमोर जुगार खेळणाऱ्याना पोलीसांनी रंगेहात पकडले
करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा,ता.5 : येथील आदिनाथ कारखान्यासमोर जुगार खेळणाऱ्याना पोलीसांनी रंगेहात पकडले आहे. हा प्रकार परवा (ता.3) दुपारी 4-30 वाजता घडला आहे. या प्रकरणी फिर्यादी पोलीस काॅन्स्टेबल आकाश अनिल भोजणे यांनी दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले की 03/08/2020 रेाजी मी, पोसई माहुरकर, पो.क. बागल, असे खाजगी वाहनाने जात असताना आदिनाथ कारखाना समोर भाळवणी (ता. करमाळा) गावातील सुनिल दगडे यांचे राहते घराचे पाठीमागे आडोशाला काही इसम पत्यांचा डाव खेळत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने, लागलीच दोन इसमांना पंच म्हणुन बोलावुन घेउन तेथे चालत गेलो असता, तेथे काही इसम वर्तुळाकार बसुन पत्याचे डावावर जुगार खेळत असल्याचे दिसले. लागलीच त्यांना गराडा घालुन जागीच पकडले. त्यामध्ये 1) सुरेश किसन तुपसमिंदर वय 45 वर्षे, रा जेउर ता करमाळा 2) शंकर विष्णु माने वय 35 वर्षे, रा जेउर ता करमाळा 3) बळीराम रामदास इंदलकर वय 47 वर्षे, रा भिवरवाडी ता करमाळा 4) सुनिल दगडे वय 40 वर्षे रा. भाळवणी ता.करमाळा 5) उमेश जाधव वय वांगी ता करमाळा जि.सोलापूर अशी आहेत. त्यांच्या कडून पत्ते व 3700 रूपये रोख जमा केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक प्रविण साने हे करत आहेत.