दशपर्णी आर्कने शेतकऱ्याच्या उत्पन्नात कमी खर्चात आधिक वाढ – जीवन होगले
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : घारगाव (ता.करमाळा) येथील पारंपारिक प्रगतशील शेतकरी कमी खर्चातून पूर्णत्वास जैविक शेतीच्या माध्यमातून वीस शेतकरी एकत्र येत जय किसान गट स्थापन केला. शेतीच्या माध्यमातून विविध प्रकारचे प्रयोग घारगाव येथे केले जातात. रासायनिक बाजारी खते औषधे न वापरता कमीत-कमी खर्चात जैविक शेती करण्याचा मानस या गटाने घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक बचत व उत्पन्न वाढीस अधिक वाढ होते.आम्ही जय किसान गटाच्या माध्यमातून जैविक व विषयुक्त शेती करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. याबाबत अधिक माहिती हवी असल्यास माझ्याशी संपर्क करावा असे अहवान जय किसान गटाचे प्रमुख जिवन होगले यांनी केले आहे.
भरमसाठ रासायनिक खतांची होणारी दरवाढ.शेतीला खर्च करून देखील दूषित वातावरणामुळे हाता-तोंडाशी आलेलं पिक वाया जाते.आणि आर्थिक नुकसान होते.
याला फाटा म्हणून घारगाव येथील शेतकरी जिवन होगले यांच्या संकल्पनेतून वीस सभासद एकत्र येऊन किसान शेतकरी गट स्थापन करण्यात आला.आणि “दशपर्णी आर्क” शेतकरी उपयुक्त आर्क कमी खर्चात घरच्या घरीच तयार करून जैविक शेती करण्याचा प्रयत्न करून यशस्वी झाला. दशपर्णी हे द्रावन शेतकऱ्यांसाठी फार उपयुक्त ठरत आहे. हे जिवआमृत शेतकऱ्यांना वरदान आहे. कमी खर्चातून अधिक उत्पन्नास वाढ या माध्यमातून होते.आणि कीड अळीला आळा बसतो. शेतकऱ्यांना घरच्या घरीच दशपर्णी आर्क तयार करता येतो.यावेळी अरविंद होगले, प्रविन होगले, तानाजी भादलकर, जिवन होगले, विकास कत्रजकर, रघुनाथ आडसुळ, आनंद (पप्पू) गायकवाड, आप्पा गायकवाड दगडु होगले आणी पाणी फाउंडेशनचे आशिष लाड सह पंचक्रोशीतच शेतकर्यांच्या माध्यमातून हा प्रयोग यशस्वी करण्यात आला.
200 लिटर पाण्यामध्ये कडू निंबाचा ५ किलो पाला, सिताफळाची ३ किलो पाला, आणि २ किलो प्रमाणे करंज, निरगुड, टनटणी, रूई, पपई, मोगला ऐरंड, लाल कणेरी, गुळवेल, हिरवी मिर्चीसह 2 किलो शेण, अर्धा किलो लसूण आणि १०लिटर गोमूत्र एकत्रीत मिश्रण करून कमी कालावधीत कमीत कमी २१व्या दिवसी जैविक दशपर्णी आर्क तयार होते. त्यांची बाजारी किमंत 400 रु लिटर प्रमाणे आहे.