जमीन नावावर का करत नाही म्हणून नातवाची 85 वर्षाच्या आजोबाला मारहाण - Saptahik Sandesh

जमीन नावावर का करत नाही म्हणून नातवाची 85 वर्षाच्या आजोबाला मारहाण


करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा,ता.5: जमीन नावावर का करत नाही म्हणून नातवाची 85 वर्षाच्या आजोबाला मारहाण झाली आहे. हा प्रकार अळजापुर( ता. करमाळा ) येथे 31 जुलैच्या रात्री झाला आहे.

याबाबत अर्जुन श्रीपती घोडके (वय- 85) वर्ष रा.आळजापूर यांनी फिर्यादी दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले की,मी माझी पत्नी दरूबाई, मुलगा आप्पा, नातु कशीस असे एकत्रात राहणेस असुन मला अळजापुर येथे आर्धा एकर जमीन असुन त्यातुन येणारे उत्पदनावर मी माझी कुंटूबाची उपजिवीका भागवितो. माझा सर्वात लाहन मुलगा आप्पा व नातु कशीस जमीनीचा कारणावरुन या पुर्वी सुध्दा माझे बरोबर वाद करत होते.

Yash collection karmala clothes shop

31/07/2022 रात्री 11/00 वाचे सुमारास मी माझे जावई बबन राणु थोरात यांचे घरा मध्ये झोपलो होतो. माझा नातु काशीस हा दारु पेवून घरी त्याचे लाथा मारुन दरवाजा उघडला ,ये मता-या जमीन माझे नावे करुन दे ,नाहीत तुला जीवंत सोडनार नाही. असे म्हणुन दरवाजाला लावलेला दगड माझा नातु कशीस आप्पा घोडके यांनी घेवून माझे उजव्या हातावर मारला. गोंधळ ऐकून शेजारचे लोक आले व त्यांनी माझी सुटका केली.
याप्रकरणी पोलिसांनी नातवाच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

S.K. collection bhigwan
Sonaraj metal and crockery karmala
Sonali ply and furniture shop karmala

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!