घर पेटवले – एक हजार रूपयाचे नुकसान
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : घर पेटवल्याने एक हजार रूपयाचे नुकसान झाले आहे. हा प्रकार २२ जुलैला रात्री साडेअकराच्या सुमारास पोथरे परिसरातील वस्तीवर घडला आहे. या प्रकरणी रेश्मा भागवत पवार (रा. पोथरे) या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यात तिने म्हटले आहे, की २२ जुलैला रात्री साडेअकराच्या सुमारास काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने मी जागेवरून बाहेर आलेतर आमच्या घरासमोरचे लाकडी छप्पर पेटलेले होते. त्यावेळेस माझे पती बाहेर आले व त्यांनी बॅटरीने पाहिले असता, यादव वसंत काळे हा पळून जात असताना दिसला. सदर छपरामध्ये धान्य, संसारोपयोगी भांडी व वापरण्याचे कपडे होते. ते जळून एक हजार रूपयाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पोलीसांनी यादव काळे याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.