करमाळा बसस्थानकातून पुन्हा एकदा चोरी !
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा बसस्थानकातून सातत्याने चोय होत आहेत. आणखीन एक चोरी झाली असून, महिलेच्या पिशवीतील १० हजार रू. चोरट्याने लंपास केले आहेत. हा प्रकार २२ जुलैला सायंकाळी चार वाजता घडला आहे. यात तुळसाबाई नामदेव करे (रा. जेऊर) या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यात तिने म्हटले आहे, की माझ्या शेतीच्या कामासाठी ऑफिसमधून दहा हजार रूपये उसणे घेऊन जेऊरला जात असताना चार वाजता बस मध्ये बसले असताना, माझे पर्सची चैन उघडली दिसली. त्यात माझे उसणे आलेले दहा हजार रूपये चोरट्याने चोरून नेले आहेत. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.