करमाळ्यात जुगार खेळणाऱ्या अकरा जणांना रंगेहाथ पकडले - Saptahik Sandesh

करमाळ्यात जुगार खेळणाऱ्या अकरा जणांना रंगेहाथ पकडले

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरातील किल्ला विभागात जुगार खेळताना ११ जणांना पोलीसांनी रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याकडून २० हजार १०० रू. रोख जप्त करण्यात आले आहेत. हा प्रकार २२ जुलैला सायंकाळी सात वाजता घडला आहे. यात पोलीस कॉन्स्टेबल अतुल सर्जेराव लवळे यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात त्याने म्हटले आहे, की किल्ला विभागात पत्त्यावर रम्मी नावाचा जुगार चालू असल्याची माहिती समजल्यावर किल्ला विभागात जांभळे यांच्या पत्राशेडच्या आडोशाला ११ जण जुगार खेळताना आढळले. यामध्ये केशव संतोष साळुंके (किल्ला), पप्पू नारायण लष्कर (नागराज गल्ली), बबलू सुभाष दुधाट (रंभापूरा), प्रताप अरूण जांभळे (खडकपुरा), प्रकाश बबन कांबळे (सिध्दार्थनगर), धवल रमेश कांबळे (सिध्दार्थनगर), सचिन विठ्ठल घोगरे (कानाडगल्ली), कपिल लक्ष्मण यादव (खडकपुरा), विकास अशोक फंड (फंडगल्ली), बबलू सुरेश भोज (कानाडगल्ली), नागेश राजेंद्र ओहोळ (सुमंतनगर) यांचा समावेश असून त्यांच्याकडून २० हजार १०० रू. जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे.

Yash collection karmala clothes shop
S.K. collection bhigwan
Sonaraj metal and crockery karmala
Sonali ply and furniture shop karmala

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!