जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना पोलीसांनी पकडले रंगेहाथ - दोघेजण पळाले - Saptahik Sandesh

जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना पोलीसांनी पकडले रंगेहाथ – दोघेजण पळाले

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना पोलीसांनी रंगेहाथ पकडले आहे. विशेष म्हणजे पोलीस येताच त्यातील दोघांनी पळ काढला आहे. हा प्रकार दहिगाव (ता.करमाळा) येथे घडला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल पांडूरंग लोकरे यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की २५ जुलैला दुपारी सव्वाएक वाजता दहिगाव येथे ग्रामपंचायती जवळ नऊजण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्याठिकाणी आम्ही छापा टाकला असता, तेथे नऊजण मिळाले. त्यातील दोघेजण पळून गेले. यात विठ्ठल नामदेव टकले, भैरवनाथ मोहन माने, परमेश्वर बिरूदेव श्रीराम, अतुल तात्या शिंदे, राहूल हंबीरराव पाटील, सतीश महादेव शिंदे, संजय दत्तात्रय गलांडे (सर्व रा. दहिगाव ) तर नितीन देविदास नरूटे व तुकाराम श्रीमंत नरूटे (दोघे रा. दहिगाव) हे पळून गेले आहेत.

S.K. collection bhigwan

यात पोलीसांनी सात जणांना अटक करून त्यांच्याकडून ६ हजार ७७० रू. व पत्त्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलीसांनी नऊ जणाविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.

Yash collection karmala clothes shop
Sonaraj metal and crockery karmala
Sonali ply and furniture shop karmala

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!