वांगी नं ३ येथे तीन अज्ञात चोरट्यांनी पळविले २ लाख २९ हजारांचे सोने – तिघांपैकी एकास पकडण्यात करमाळा पोलिसांना यश
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : वांगी नं ३ (ता.करमाळा) येथे तीन अज्ञात चोरट्यांनी एका घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून, घरामध्ये प्रवेश करून, स्वयंपाक खोलीतील कपाटामध्ये ठेवलेले २ लाख २९ हजारांचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम लंपास केले आहे. हा प्रकार २७ जुलैच्या मध्यरात्री घडला आहे. या तिघांवर कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून, या चोरट्यापैकी एका चोराला पकडण्यात करमाळा पोलिसांना यश आले आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली.
याप्रकरणी धनंजय किसन तळेकर वय 29 वर्षे धंदा मोटार रिवायडींग रा. वांगी नं.३ (ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली असून त्यात त्यांनी म्हटले की, २७ जुलैच्या मध्यरात्री
वांगी नं ३ (ता.करमाळा) येथील माझ्या घरी तीन अनोळखी चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून, घरामध्ये प्रवेश करून, स्वयंपाक खोलीतील कपाटामध्ये ठेवलेले २ लाख २९ हजारांचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम पळविले.
यामध्ये 1,17,500/- रू. अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठन, 2) 70,500/- रु. दीड तोळ्याची सोन्याची फुलं व झुबे 3) 23,500/- रू. ची अर्धा तोळा सोन्याची पिळ्याची अंगठी 4) 14,000/- रू. चे तीन ग्रॅम सोन्याचे मणी 5) 4,000/- रूपये रोख रक्कम त्यामध्ये 500 रूपये दराचे 02 व 100 रूपये दराच 30 चलनी नोटा असा एकूण 2,29,500/- किमतीचे सोने व रोख रक्कम कोणीतरी अनोळखी व्यक्तीनी पळवून नेले आहे, हे समजले. त्यानंतर करमाळा पोलिसांनी यात गुन्हा दाखल करून ताबडतोब या प्रकरणाची चौकशी करून यातील एका चोरट्यास पकडण्यात यश आले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री.जगताप हे करत आहेत.