टिपरच्या 18 हजारांच्या दोन बॅटऱ्यांची चोरी – चोरणाऱ्या तिघांपैकी एकास पोलिसांनी पकडले
करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा,ता.8: टिपरच्या 18000 रूपयाचा दोन बॅटर्याची चोरी जेऊर (ता.करमाळा) येथे घडली आहे. ही घटना आज (ता.8) पहाटे 2 वाजता घडली आहे. हा गुन्हा दाखल होताच करमाळा पोलिसांनी तातडीने पोलीस यंत्रणा लावली व चोर कोणत्या दिशेने गेले आहेत, त्याठिकाणी जावून रात्रीत तिघांपैकी एका चोरास पकडण्यात करमाळा पोलिसांना यश आले आहे.
याप्रकरणी गणेश श्रीकृष्ण कांबळे(जेऊर,ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले की ,माझेकडे टाटा कंपनीचा एक टिपर असुन त्याचा आरटीओ पासिंग नं WB45-1099 असा आहे. तो मी मागील तीन महिन्यापासुन वापरित आहे. सदरचा टिपर हा मी माझा मित्र दिपक महादेव रासकर रा.लव्हेरोड जेउर याचे राहते घराचे बंगल्याचे आवारात मोकळ्या जागेत लावत असतो. मला आज (ता.8) पहाटे 02/00 वाचे सुमारास माझे मित्र दिपक रासकर याने सांगितले की, मी रात्री अंदाजे 01:30 वाचे सुमारास गाडीचा आवाज आल्याने बाहेर येवुन पाहिले असता एक मोटारसायकलवर तीन इसम पळून जाताना दिसले.
त्यांचे सोबत काहीतरी बॅटरी सदृश्य वस्तु दिसत होती म्हणुन मी टिपर जवळ जावुन पाहिले असता गाडीच्या दोन बॅट-या दिसुन आल्या नाहीत असे मित्र दिपक याने कळविले. त्यामुळे मी लागलीच माझे राहते घरातुन मित्र दिपक याचे घरी लावलेल्या माझे टिपरच्या बटरी जावुन पाहिले असता बटरीला जोडलेल्या वायर तोडुन दोन बटरी चोरी केल्याच्या दिसुन आल्या. त्यामुळे माझे गाडीच्या बटरीची चोरी झाल्याची माझी खात्री झाली.त्या 18000 रूपये किंमतीच्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.