शेतातील पंपाच्या केबलची चोरी - पोलीसात गुन्हा दाखल - Saptahik Sandesh

शेतातील पंपाच्या केबलची चोरी – पोलीसात गुन्हा दाखल

करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा,ता.8:
शेतातील पंपाच्या केबलची चोरी झाली असून या प्रकरणी करमाळा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार पोफळज येथे 27 जुलैपुर्वी घडला आहे.
याप्रकरणी गौतम काशीनाथ कांबळे (रा. पोफळज ता. करमाळा, हल्ली बालाजीनगर दौंड ता. दौंड जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले की मी जिल्हा परिषद प्रथमीक शाळा खोरवडी (ता. दौंड जि. पुणे) येथे प्राथमीक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तसेच माझी शेती पोफळज (ता. करमाळा) येथे असुन त्या शेतीमध्ये उसाचे पिक आहे. उसाच्या पिकास पाण्याची सोय म्हणुन विहीर असुन त्या विहीरीवर इलेक्ट्रक मोटर बसवलेली आहे. सदर शेती मी सुटटीच्या दिवशी अथवा साप्ताहीक सुटटीच्या दिवशी शेतात येवुन शेती करतो.

Yash collection karmala clothes shop

दि. 24/07/2022 रोजी मी साप्ताहीक सुटटी निमीत्त माझे गावी पोफळज येथे आलो होतो.तेथे शेतामध्ये फेर फटका मारत मारत दुपारी 1.00 वाच्या सुमारास मी शेतातील विहीरीजवळ गेलो असता तेथे मला विहीरीच्या मोटरीला कनेक्शन दिलेली वायर तुटलेली दिसली. तेव्हा मी इकडे तिकडे पाहीले असता माझे लक्षात आले कि, माझे विहीरीच्या मोटरला कनेक्शन जोडलेली सुमारे 35 ते 40 फुट केबल तेथे नव्हती. मी माझे केबलचा आजुबाजुला शोध घेतला असता ती मला कोठेही मिळुन आली नाही. यापुर्वी देखील माझे विहीरीवरील पाइप तोडुन, मोटरच्या फिल्टरच्या जाळीचे कोणीतरी अज्ञाताने तोडुन नुकसान केलेले होते. म्हणुन माझी खात्री झाली कि, माझे मोटरच्या कनेक्शनची वायर कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेलेली आहे. तीची किमंत 1300 रूपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Sonaraj metal and crockery karmala
Sonali ply and furniture shop karmala

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!