उमरड येथील सखुबाई पाखरे यांचे निधन

करमाळा : उमरड (ता. करमाळा) येथील सखुबाई गणपत पाखरे (वय ७२) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांचे मागे पती, तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचेवर २८ सप्टेंबर रोजी उमरड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आण्णा पाखरे, रामचंद्र पाखरे, सोमनाथ पाखरे यांच्या त्या आई होत.

 
                       
                      