सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन कविटगाव शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवीटगाव येथे 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी किशोरी मेळावा आणि महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन कविटगावच्या सरपंच सौ. विद्याताई सरडे , सौ. मनिषा जगदाळे सौ. रुपाली जगदाळे मंडोदरी शिंदे जयश्री शिंदे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बालिका दिनाचे औचित्य साधून विविध सांस्कृतिक कार्यक्रम , क्रिडा स्पर्धा , महिलांची संगीत खुर्ची , जात्यावरील ओव्या आणि उखाणे इत्यादी कार्यक्रम मोठय़ा आनंदाने पार पडले.कार्यक्रमानंतर सर्व महिलांना अल्पोपहार देण्यात आला. विविध स्पर्धेत विजेत्या महिलांचा आणि मुलींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी गावातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री शिंदे मॅडम सौ.आहेरकर, जगदाळे सर श्री. खराडे सर आणि श्री. भालचंद्र गावडे सर यांनी परिश्रम घेतले. श्री. खराडे सर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.