वांगी नं ३ येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे (रक्कम रुपये ५५ लाख)भूमीपूजन करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच यावेळी आमदार फंडातून विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासाठी सभामंडप(रक्कम रुपये १२ लाख) व वांगी नं ३ ग्रामपंचायत कार्यालय (रक्कम रुपये २२ लाख) तसेच सिमेंट काँक्रेट रस्ते व गटारी या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी युवा नेते शंभूराजे जगताप ,मा.पं.स.सदस्य सुहास नाना रोकडे,आदिनाथ चे संचालक पांडुरंग आबा जाधव ,मकाईचे संचालक संतोष बाप्पा देशमुख ,नीळकंठ आप्पा देशमुख,तानाजी बापू झोळ,चंद्रहास बापू निमगिरे, राजेंद्र बारकुंड, रोहिदास सातव,अशोक तकीक,दिनकर तात्या रोकडे,तात्यामामा सरडे,धनंजय गायकवाड, दादा रोकडे,रायचंद खाडे व वांगी पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच वांगी नं ३ चे विद्यमान सरपंच मयुर रोकडे उपसरपंच संतोष कांबळे व ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ काका रोकडे,शंकर जाधव,चंद्रकांत कदम यांच्या तर्फे मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.