विविध भाषणे, नाटके सादर करत सावित्रीबाई फुलेंना केले अभिवादन - Saptahik Sandesh

विविध भाषणे, नाटके सादर करत सावित्रीबाई फुलेंना केले अभिवादन

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा कालच्या ३ जानेवारी जयंतीदिना निमित्ताने  विद्यार्थ्यांनी भाषणे व नाटके सादर करत सावित्रीबाई फुलेंना अभिवादन केले.

श्री ऊतरेश्वर माध्य व उच्च माध् विदयालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.प्रशालेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती दि. 03 जानेवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद शाळा केम माजी मुख्याध्यापिका श्रीमती लोंढे , नागटिळक मॅडम, गुळवे मॅडम,ओहळ मॅडम यांची उपस्थिती होत्या.

प्रतिमेचे पूजन अध्यक्ष लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले. लोंढे मॅडम, नागटिळक मॅडम , राऊत मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांचे कार्य विद्यार्थ्यांना सांगितले. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी भाषणे केली. इयत्ता सहावी क मधील विद्यार्थिनींनी स्त्री शिक्षणात सावित्रीबाई फुले यांचे योगदान या विषयावर नाटक सादर केले. तसेच इयत्ता दहावी क मधील विद्यार्थिनींनी मुलगी वाचवा देश वाचवा या विषयावर नाटक सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी प्रतिक्षा शिंदे, प्रगती रायचूर यांनी केले. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयानंद तळेकर यांची विशेष उपस्थिती होती.

सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री वाघमारे सर यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी माननीय मुख्याध्यापक कदम सर, पर्यवेक्षक सांगवे बी.व्ही सर सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
%d bloggers like this: