शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर व राजाभाऊ तळेकर विद्यालय केम यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : महात्मा फुले शिक्षण समाज विकास मंडळ संचलित श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर व राजाभाऊ तळेकर विद्यालय केम यांच्या संयुक्त विद्यमाने 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात आली .यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन शाळेतील सर्व शिक्षिका व विद्यार्थिनींनी केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना स्नेहल तिकटे यांनी केले तर जास्मिन खान, समीक्षा दरगुडे ,शिवानी बिचितकर, सिद्धी तळेकर ,गौरी तळेकर ,लक्ष्मी तळेकर, लक्ष्मी पळसकर, पूर्वा तळेकर ,सिद्धी तळेकर यांनी उत्कृष्ट भाषण केले तसेच फनी गेम्स घेतल्याने मुले आनंदित दिसत होती.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक विनोद तळेकर होते. श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री.नागनाथ तळेकर, श्री भारत गायकवाड श्री.बाळासाहेब देशमुख , सौ .शोभा लोंढे , श्री.दत्तात्रय पवार ,श्री.सुरेश पवार,श्रीम. माधुरी काळे ,श्री.बाळासाहेब सोनवणे,श्री. समाधान तळेकर,श्रीम. संध्याराणी तळेकर श्रीम.वंदना नाईक,श्री. रामकाका तळेकर,श्री. रामभाऊ राऊत, उपस्थित होते.
“सोसूनी अनंत यातना, शिकवलेस तु स्त्रियांना ,धन्य धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना” या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.