निर्भया पथकाने केमच्या विद्यार्थिनींना केले मार्गदर्शन
केम (प्रतिनिधी – संजय जाधव) : श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजमध्ये निर्भया पथक, करमाळा यांचे कॉलेज विद्यार्थिनीसाठी विशेष मार्गदर्शन व्याख्यान संपन्नकेम- श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम याठिकाणी निर्भया पथक करमाळा यांचे विद्यार्थिनीसाठी विशेष मार्गदर्शन व्याख्यान संपन्न झाले. यावेळी प्रारंभी परमपूज्य डॉ बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले त्यानंतर करमाळा पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली पी.एस.आय श्री प्रवीण साने, पोलीस नाईक श्री गणेश गायकवाड, पोलीस नाईक श्री शिवदास गर्जे, पोलीस कॉन्स्टेबल श्री संभाजी पवार, पोलीस कॉन्स्टेबल श्री हेमंत पाडूळे, केम पोलिसस्टेशनचे श्री जाधव साहेब यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री एस.बी.कदम हे उपस्थित होते.
यावेळी श्री हेमंत पाडोळे यांनी विद्यार्थिनींना आपले अधिकार व स्वरक्षण याविषयी प्रश्न उत्तराच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थिनींच्या मनातील विविध शंकांचे निरसन केले. करमाळा पोलीस दल नेहमीच आपल्या सोबत असेल याची ग्वाही दिली. व सर्व विद्यार्थिनींनी आपली मते निर्भीडपणे मांडण्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.संतोष साळुंखे यांनी केले. या कार्यक्रमास प्रा.अमोल तळेकर , प्रा.संतोष रणदिवे, प्रा.सतीश बनसोडे यांनी सहकार्य केले.