स्कुटीला कारची धडक - निरूपणकार स्वाती मोरे जखमी - Saptahik Sandesh

स्कुटीला कारची धडक – निरूपणकार स्वाती मोरे जखमी

करमाळा / संदेश करमाळा :

करमाळा : स्कुटीला पाठीमागून येणाऱ्या कारने धडक देऊन झालेल्या अपघातात निरूपणकार स्वाती महादेव मोरे व देवळाली येथील साधनाताई गोसावी या दोघी जखमी झाल्या आहेत. हा अपघात ६ सप्टेंबरला दुपारी दोन वाजता खडकेवाडी फाट्याच्या जवळ घडला आहे.

या प्रकरणी स्वाती महादेव मोरे (रा. बावी, ता. माढा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की मी निरूपणकार असून ठिकठिकाणी बैठकी घेऊन निरूपण करते. ७ सप्टेंबरला देवळाली येथे पावणेअकरा ते दीड पर्यंत निरूपण केले. व त्यानंतर झरे येथे निरूपण करण्यासाठी साधनाताई गोसावी यांच्याबरोबर स्कुटी क्र. एमएच ४५ एएम २८५२ यावर बसून जात असताना दुपारी दोन वाजता खडकेवाडी फाट्याजवळ कार क्र. एमएच १६ बीवाय ४८०५ ने पाठीमागून धडक दिली. त्यात आम्ही दोघी पडून स्कुटीचे तर नुकसान झालेच परंतू आम्ही दोघीही जखमी झालो आहोत. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!