उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक दिनानिमित्त ‘सन्मान गुरू माऊलींचा’ कार्यक्रम संपन्न
केम : ( प्रतिनिधी – संजय जाधव) : उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज, केम या ठिकाणी सन्मान गुरु माऊलींचा हा कार्यक्रम ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिना निमित्ताने अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार श्री संजय जाधव हे होते. या कार्यक्रमास श्री.नागनाथ तळेकर गुरुजी, मुख्याध्यापक,श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर ,श्री. विजय माने सर, शारदाताई गोविंदराव पवार माध्यमिक विद्यालय, श्री.अर्जुन रणदिवे प्राचार्य, नुतन माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय, श्री.प्रकाश कोरे, अजितदादा पवार माध्यमिक विद्यालय, वडशिवणे, दयानंद तळेकर अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती, केम यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.बापूराव सांगवे पर्यवेक्षक, श्री उत्तरेश्वर माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय, केम यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य डॉ.बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून करण्यात आली. यावेळी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे पत्रकार श्री संजय जाधव यांनी श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज येथील नवनवीन उपक्रमाचे कौतुक केले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व सकारात्मक करणारे हे कॉलेज होय असे त्यांनी गौरव उदगार काढले. यावेळी केम गावचे उपसरपंच श्री नागनाथ तळेकर गुरुजी यांनी या ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना अभ्यासपूरक कार्यक्रमात सहभागी होऊन शिक्षण साधना करावी असे सांगितले.
यावेळी श्री प्रकाश गोरे सर यांनी मी या कॉलेजच्या दुसऱ्या बॅचचा विद्यार्थी असल्याचे अभिमानाने सांगितले.कॉलेजच्या विकास कामास आपले सहकार्य राहील याची त्यांनी ग्वाही दिली. यावेळी श्री माने सर यांनी दर आठवड्याला या ठिकाणी राबवणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. यावेळी प्राचार्य श्री अर्जुन रणदिवे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या गुरूंचा सन्मान व गुरु शिष्य परंपरा यावर मार्गदर्शन केले.
यावेळी शालेय समिती अध्यक्ष श्री दयानंद तळेकर यांनी भारतीय संस्कृती आणि शिक्षकविद्यार्थी नाते संबध यावर प्रबोधन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक श्री बापूराव सांगवे यांनी विद्यार्थ्यांना अंगी धीटपणा बाळगण्याचे मंत्र दिला. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार या मंत्रातून आपले ध्येय विकसित करण्याचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात कु प्रकाश कुंभार , कु.गणेश सुरवसे या विद्यार्थ्यांनी शिक्षकाप्रती असणाऱ्या आदरयुक्त भावना आपल्या मनोगततून व्यक्त केल्या.
या कार्यक्रमात परमपूज्य डॉ बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करणारे कलावंत आर्टिस्ट श्री नितीननाना तळेकर यांचा सर्व मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी शेख हिने केले तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. संतोष साळुंखे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे, प्रा.संतोष साळुंखे, प्रा. संतोष रणदिवे, प्रा.सतीश बनसोडे, प्रा.पराग कुलकर्णी, प्रा.अमोल तळेकर यांनी सहकार्य केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केले.