मंगेश चिवटेंना मिळालेली संधी ही गोरगरिबांची आरोग्य सेवेसाठी मिळालेली संधी आहे : माजी मंत्री बच्चू कडू
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहृदय असलेला तळागाळातून वर गेलेला नेता असून सर्वसामान्यांची कळवळा असलेले एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात एकही रुग्ण उपचाराविना राहणार नाही, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाकलेला विश्वास सार्थ करून महाराष्ट्रातील रुग्णांना मदत देण्यासाठी रुग्णसेवक म्हणून कायमस्वरूपी काम करतील, असा आशावाद माजी मंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केला.
यावेळी पुढे बोलताना बच्चू कडू पुढे म्हणाले की, मंगेश चिवटे यांना मिळालेली संधी ही राज्यातील गोरगरिबांची आरोग्य सेवा करण्यासाठी मिळालेली संधी आहे, शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा देणारी रुग्णसेवकांची टीम उभा केली असून या माध्यमातून अडचणीत असलेल्या रुग्णाला मदतीचा हात देणारी यंत्रणा उभी राहिली, असेही त्यांनी म्हटले. यावेळी पत्रकार राजा माने, माजी आमदार नारायण पाटील, रश्मी बागल-कोलते, नागेश अक्कलकोटे यांची भाषणे झाली.
आज करमाळा शहरात ब्लड बँकेचे लोकार्पण झाले असून येणाऱ्या काळात लवकरच करमाळा डायलिसिस सेंटर उभा करून सेवा करणार आहे स्वातंत्र्यसैनिक कैलासवासी स्वातंत्र्यसैनिक मनोहर गणपत चिवटे या नावाने मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभा करून सर्वसामान्यांना अल्प दरात रुग्ण सेवा देण्याचं माझ स्वप्न मी आपल्या सर्वांच्या सहकार्याने लवकर पुरे करील.
– मंगेश चिवटे (कक्षप्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता)
यावेळी, जेष्ठ पत्रकार राजा माने सोलापूर, शिवसेना सोलापूर संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत सर, करमाळा माजी आमदार नारायण आबा पाटील, करमाळा तालुका नेत्या रश्मी दिदि बागल कोलते, बार्शी न.पा. विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे,सोलापूर जिल्हा शिवसेना प्रमुख शिंदे गट महेश चिवटे, प्रा. विलासराव घुमरे, प्रा.शिवाजीराव बंडगर, गणेश भाऊ करे पाटील, अनिरुध्द आणणा कांबळे, राजेंद्रसिंह राजेभोसले, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड उपस्थित होते.
तसेच कळंब नगराध्यक्ष राजाभाऊ मुंडे, सुजित तात्या बागल, जिल्हा दुध संघाचे संचालक विकास गलांडे, भाजप चे करमाळा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे, नवनाथ बापू झोळ, माजी अर्बन बँक संचालक शिवराज चिवटे,तानाजी बापू झोळ,सौ.सविता देवी राजे भोसले, रमेश आण्णा कांबळे, सूर्यकांत पाटील, उदयसिंह पाटील, सुनील सावंत, अमरजित साळुंखे, सुभाष फरतडे, डबल महाराष्ट्र चॅंपियन आफसर जाधव, मुन्ना शेठ, आण्णा पेठकर, अतुल फंड, देवानंद बागल, दिलिप दादा तळेकर, दत्तात्रय भाऊ मस्के पाटील, अमोल शेठ जगदाळे, विठ्ठल आबा मस्के, संतोष वारे, काकसाहेब सरडे, पाटील साहेब, रामभाऊ ढाणे, विनोद महानवर, विनोद पाटील सर, संजय शिलवंत, जगदीश अग्रवाल, अतिश दोशी, पपू सिंधी, महाजन, नगरसेवक अल्ताफ तांबोळी, जगदीश ओहळ पत्रकार नासिर कबीर, पाखरे सर, नरसाळे साहेब, स्वामी साहेब, आसफाक सय्यद, अलम शेख, सचिन हिरडे, शितलकुमार मोटे, गाडे साहेब, संभाजी कोळेकर, निलेश होनकळसे, मुकेश हलवाई, अभिजीत गायकवाड, गणेश कोरपे,प्रहार संघटनेचे सोलापूर जिल्हा दत्ता मस्के मंगेश कुलकर्णी अजय तळेकर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन शेखर जोगळेकर, सारिका चेंडगे, विलासराव दोलतडे केल्याबद्दल यांचा सन्मान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नुतन विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांच्या शुभ हस्ते कमलाभवानी मातेचे पुस्तक भेट देऊन करण्यात आला.