प्रदुषणमुक्त मिरवणूक काढा – कार्यकर्त्यांचे गणेशमंडळांना आवाहन
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.8) : गणेशविसर्जन मिरवणूक ही गुलाल, फटाके व डाॅल्बी मुक्त काढावी असे अवाहन येथील ग्रामसुधार समिती व अंधश्रध्दा निर्मूलन समिती शाखा करमाळा यांच्या वतीने सायकल रॅली काढून प्रत्येक गणेश मंडळाला भेट देऊन केले आहे.
यावेळी पर्यावरणपूरक गणेशविसर्जन मिरवणूक काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात प्राचार्य नागेश माने, ज्येष्ठ कवी प्रकाश लावंड, दिगंबर साळुंके, ग्रामसुधारचे अध्यक्ष ॲड.डाॅ.बाबूराव हिरडे, अंधश्रद्धा निर्मूलन चे कार्याध्यक्ष अनिल माने तसेच कलाकार समशेर व सलीम शेख, राजाभाऊ साने, शिक्षक संतोष माने, बाळासाहेब दुधे , हरीभाऊ पिंपळे, रोहन माने, अश्रूबा माने, ॲड.आकाश मंगवडे, डी.जी.पाखरे आदीजण या रॅलीत सहभागी झाले होते.
अंधश्रद्धा निर्मूलन चे ज्येष्ठ मार्गदर्शक व्ही.आर.गायकवाड यांचेमार्गदर्शनाखाली या रॅलीचे नियोजन करण्यात आले होते. छत्रपतीशिवाजी तरूण मंडळाच्यावतीने ॲड. राहूल सावंत व नगरसेवक संजय सावंत यांनी रॅलीचे स्वागत केले. रॅलीचा समारोप यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेच्या आवारात करण्यात आला. यावेळी यशकल्याणीचे अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील यांचा वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी सन्मान केला. यावेळी डाॅ.हिरडे व श्री.करे-पाटील यांनी समारोपाचे भाषण केले.