घोटी ग्रामस्थांच्या वतीने ‘मदार’ टीमचा सत्कार आयोजित
करमाळा (संदेश प्रतिनिधी): २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘मदार’ या चित्रपटाने ‘संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट’ या पुरस्कारासह पाच पुरस्कार पटकावले आहेत, ‘मदार’ हा चित्रपट करमाळा तालुक्यातील घोटी गावचे सुपुत्र मंगेश बदर यांनी दिग्दर्शित केला आहे. आपल्या गावाच्या सुपुत्राच्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी घोटी ग्रामस्थांच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी घोटी येथे सायंकाळी ६ वाजता सत्कार समारंभ आयोजित केला आहे.
सामाजिक विषय हाताळलेल्या या चित्रपटात मंगेश बदर यांनी लेखक, दिग्दर्शक व निर्माता अशी तिहेरी भूमिका या चित्रपटासाठी पार पाडली. अभिनेत्री अमृता अगरवाल हिच्यासह इतर कलाकार आदिनाथ जाधव, पांडुरंग राऊत, आजिनाथ केवडे,बलदोटा हे देखील करमाळा तालुक्यातील घोटी गावचे आहेत. मदार हा संपूर्ण चित्रपट करमाळा तालुक्यातील घोटी, करमाळा शहर व केम या ठिकाणी चित्रित करण्यात आलेला आहे.
मदार या चित्रपटाने पटकावलेले पुरस्कार खालील प्रमाणे…
– महाराष्ट्र शासनाचा संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट – मदार
– अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ – मंगेश बदर – मदार
– अखिल भारतीय चित्रपट महामंडळ उत्कृष्ट अभिनेत्री – अमृता अगरवाल – मदार
– अखिल भारतीय चित्रपट महामंडळ उत्कृष्ट अभिनेता – मिलिंद शिंदे – मदार
– अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ बेस्ट सिनेमाटोग्राफर – आकाश बनकर आणि अजय भालेराव – मदार
Related News :
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘मदार’ या चित्रपटाला पुरस्कार – करमाळ्यातील कलाकारांचा सन्मान..