पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'मदार' या चित्रपटाला पुरस्कार - करमाळ्यातील कलाकारांचा सन्मान.. - Saptahik Sandesh

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘मदार’ या चित्रपटाला पुरस्कार – करमाळ्यातील कलाकारांचा सन्मान..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा (संदेश प्रतिनिधी): २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘मदार’ या चित्रपटाने ‘संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट’ या पुरस्कारासह पाच पुरस्कार पटकावले आहेत, ‘मदार’ हा चित्रपट करमाळा तालुक्यातील घोटी गावचे सुपुत्र मंगेश बदर यांनी दिग्दर्शित केला असून, सामाजिक विषय हाताळलेल्या या चित्रपटात करमाळा शहरातील अमृता आगरवाल हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला असून इतर कलाकारही करमाळा तालुक्यातीलच आहेत. २०१९ मध्येच मंगेश बदर यांनी मदार हा चित्रपट बनविण्यास सुरुवात केली. मदार हा चित्रपट दुष्काळ भागातील पाणीटंचाईमुळे गावातील होणारे हाल आणि माणसा माणसांमध्ये होणारी भांडणे यावर चित्रित करण्यात आला आहे. मदार हा संपूर्ण चित्रपट करमाळा तालुक्यातील घोटी, करमाळा शहर व केम या ठिकाणी चित्रित करण्यात आलेला आहे

मदार या चित्रपटाने पटकावलेले पुरस्कार खालील प्रमाणे…
महाराष्ट्र शासनाचा संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट – मदार
– अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ – मंगेश बदर – मदार
– अखिल भारतीय चित्रपट महामंडळ उत्कृष्ट अभिनेत्री – अमृता अगरवाल – मदार
– अखिल भारतीय चित्रपट महामंडळ उत्कृष्ट अभिनेता – मिलिंद शिंदे – मदार
– अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ बेस्ट सिनेमाटोग्राफर – आकाश बनकर आणि अजय बालेराव – मदार

पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य सरकारच्यावतीने आयोजित २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप सोहळा गुरुवार दि ९ रोजी मुकुंदनगर येथील ‘सकल ललित कलाघर’ येथे पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील , प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक व निर्माते जानू बरवा, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे, पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.

जेष्ठ अभिनेत्री विद्या बालन यांच्या हस्ते अमृता हिला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेली अमृता ही करमाळ्यातील ‘हॉटेल राम भरोसे’चे उमेश आगरवाल यांची कन्या असून भाजपा शहराध्यक्ष जगदीश आगरवाल यांच्या छोट्या भगिनी आहेत. तिला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.

मदार चित्रपटाच्या कलाकारांची प्रतिक्रिया

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!