करमाळा तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतीचे २२० कर्मचारी दिसणार युनिफॉर्म आणि ओळखपत्रासह – प्रजासत्ताकदिनानिमित्त नवीन उपक्रम..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यातील सर्व 108 ग्रामपंचायत मधील 220 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एकसमान युनिफॉर्म आणि ओळखपत्र देण्यात आलेले आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली आहे.
यापुढे कर्मचारी अतिशय सुबक अशा ड्रेस कोड मध्ये दिसणार असून, असा प्रयोग राज्यात प्रथमच करण्यात आलेला आहे. या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेचे मा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते युनिफॉर्म नुकतेच वाटप करण्यात आले आहेत. असा युनिफॉर्म संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या आहेत.