करमाळयात स्व.ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त क्रिकेटचे सामने - शिवक्रांती स्पोर्टस क्लबला प्रथम क्रमांकाचे बक्षीस.. - Saptahik Sandesh

करमाळयात स्व.ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त क्रिकेटचे सामने – शिवक्रांती स्पोर्टस क्लबला प्रथम क्रमांकाचे बक्षीस..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हा समन्वयक तथा सोलापूर जिल्हा‍ नियोजन समितीचे सदस्य शिवाजी सावंत तसेच करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण पाटील व जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड यांनी युवा सेना प्रिमियर लिग चे क्रिकेट सामने आयोजित केले होते.
यात अंतीम सामन्यात विजयी होवून प्रथम क्रमांक मिळविलेल्या शिवक्रांती स्पोर्टस क्लब या संघास करमाळा तालुक्याचे युवा नेते पृथ्वीराज पाटील यांच्याकडून रक्कम रू. 15,001/-पारितोषिक देण्यात आले.

याप्रसंगी द्वितीय क्रमांकासाठी सिध्दार्थ स्पोर्टस् क्लब यांना पंचायत समितीचे माजी सभापती गहिनीनाथ ननवरे यांच्याकडून 10,001/-, तृतीय क्रमांकासाठी गौतमा स्पोर्टस् क्लब यांना युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे यांच्याकडून 7001/- तर चतुर्थ क्रमांकासाठी जेऊर क्रिकेट क्लब यांना तरटगावचे माजी सरपंच डॉ.अमोल घाडगे यांच्याकडून 5001/- बक्षिस वितरीत करण्यात आले.

या सामन्यातील 1 ते 4 विजेत्या संघाला बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रकक्ते ॲड. शिरीषकुमार लोणकर यांच्याकडून भव्य दिव्य अशी ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
सदरचे सामने यशस्वीपणे पार पाडण्यासाठी युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, रवि आटोळे, संतोष सापते, रामभाऊ ढाणे, योगेश गानबोटे, विवेक हलवाई, अनिल पाटील, शिवतेज अर्थमुव्हर्स, वासुदेव ढोके यांनी विशेष सहकार्य केले.या क्रिकेट सामन्यास करमाळा तालुक्यातील क्रिकेट रसिकांनी उत्सर्फूतपणे उपस्थिती दर्शवत सामन्यात सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!