मटका घेणाऱ्याविरूध्द गुन्हा दाखल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : कल्याण मटक्याचे आकडे घेणाऱ्या विरूध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १९ जानेवारीला सायंकाळी साडेपाच वाजता गुळसडी येथे घडला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल तौफिक रज्जाक काझी यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की गुळसडी येथे भीमनगर भागात कल्याण मटका आकडा घेणारा इसम असल्याची माहिती मिळाल्यावर आम्ही तेथे छापा टाकला असता नितीन संभाजी चव्हाण रा.गुळसडी हा कल्याण नावाचा मटक्यासाठी आकड्यावर पैसे घेताना आढळून आला. त्याच्याकडून १०५० रू. रोख, एक निळ्याशाईचा बॉलपेन, पांढऱ्या रंगाची स्लीप बूक जप्त केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास प्रविण साने हे करत आहेत.
