राज्यस्तरीय थाळीफेक स्पर्धेसाठी उत्तरेश्वर कॉलेजच्या ओंकार घाडगेची निवड

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम (ता.करमाळा) येथील श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज मधील खेळाडू ओंकार घाडगे याने आज (दि.२३) पंढरपूर या ठिकाणी झालेल्या विभागीय थाळीफेक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याची आता महाराष्ट्र राज्यस्तरीय थाळीफेक स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यापूर्वीही ओंकार घाडगे या विद्यार्थ्याने राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तुंग यश मिळवलेले आहे. श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थी आत्तापर्यंत निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, ऑनलाइन स्पर्धा परीक्षा अशा विविध स्तरात राज्यस्तरावर चमकत आहेत. क्रीडा क्षेत्रात देखील यावर्षी या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी दर्शविली आहे.
ओंकारच्या या यशासाठी त्याला मार्गदर्शक म्हणून क्रीडाशिक्षक प्रा.अमोल तळेकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच त्याचे वडील श्री धनंजय घाडगे यांनी त्याला लहानपणापासून या खेळासाठी प्रोत्साहन दिले. या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगीताई गावडे, संस्था सीईओ श्री कौस्तुभजी गावडे, मराठवाडा विभागप्रमुख प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख , प्राचार्य श्री एस.बी.कदम , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री दयानंद तळेकर यांनी अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी त्यास प्रा.डॉ. मच्छिंद्र नागरे, प्रा.संतोष साळुंखे, प्रा. संतोष रणदिवे, प्रा.सतीश बनसोडे, श्री कुंडलिक वाघमारे, श्री सरफराज मोमीन यांनी सहकार्य केले. या यशाबद्दल ओंकार घाडगेचे सर्वत्र कौतुक होत आहे.