शेत वहिवाटू नको म्हणून चौघाकडून मारहाण.. - Saptahik Sandesh

शेत वहिवाटू नको म्हणून चौघाकडून मारहाण..

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : शेत वहिवाटू नको असे म्हणून चौघा जणांनी तिघा जणांना दगडाने बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार १९ जानेवारीला दुपारी एक वाजता कविटगाव येथे घडला आहे. या प्रकरणी कावेरी सुरेश जगताप यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की १९ जानेवारीला दुपारी एक वाजता आम्ही आमच्या शेतात काम करत असताना शेजारील शेतकरी शहाजी सुर्यभान शिंदे, यशवंत सुर्यभान शिंदे, प्रशांत यशवंत शिंदे, बिटाबाई बाळू फरतडे याने विहिरीतील खरपणाच्या दगडाने मला तसेच माझा मुलगा योगेश व पती सुरेश जगताप यांना मारहाण करून जखमी केले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक माहूरकर हे करत आहेत.

यात यशवंत सुर्यभान शिंदे यांनी सुरेश भैरू जगताप, कावेरी सुरेश जगताप व योगेश सुरेश जगताप यांच्या विरूध्द फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की आमच्या जमिनीच्या बांधावरून त्यांना समजावून सांगत असताना कावेरी जगताप हिने ऊस तोडण्याच्या कोयत्याने सुरेश जगताप याने विळ्याने तर योगेश जगताप याने दगडाने मारून मला जखमी केले आहे. या प्रकरणी पोलीसांनी क्रॉस गुन्हा दाखल करून त्याचाही तपास विनायक माहूरकर हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!