पोफळज येथील २० वर्षाची युवती बेपत्ता..

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : पोफळज येथील २० वर्षाची विवाहित युवती ही पोफळज येथून बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी पालकांनी पोलीसात हरवल्याची तक्रार २० जानेवारीला केली आहे.
यात सदरची युवती घरातून बाहेर जाऊन येते म्हणून निघून गेली ती परत आलीच नाही. याबाबत गावात तसेच नातेवाईकांकडे चौकशी केली परंतू सदरची युवती सापडली नाही. त्यामुळे पालकांनी हरवल्याची तक्रार पोलीसात केली आहे.
