शहीद जवान स्मृतिदिनानिमित्त आयोजित शिबिरात केममधील ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान
केम(प्रतिनिधी/संजय जाधव): केम (ता. करमाळा) येथे २६ / ११ शहीद जवान स्मृतिदिनाचे औचित्य साधून ए पी ग्रुप उत्तरेश्वर रक्तदाते संघटना व राष्ट्रवादी केम शहर यांच्या संयुक्त विद्यमाने व कुर्डुवाडी ब्लड बँक यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरात एकूण 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये दिव्यांग व्यक्ती दत्तात्रय कुलकर्णी यांनी आत्तापर्यंत 40 वेळा रक्त दान करून समाजासमोर आदर्श ठेवला आहे. याची नोंद सेवाभावी संस्थेने घेण्याची गरज आहे. तसेच या शिबीरात सौ काशविद या एकमेव महिलेने रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन उत्तरेश्वर रक्तदाते संघटनेचे अध्यक्ष भैरू शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एपी ग्रुपचे अध्यक्ष अच्युत काका पाटील पैलवान महावीर तळेकर, महेश तळेकर,विजय मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सागर कुरडे सचिन काळे, सागर दौड, आनंद शिंदे,संदीप तळेकर, धनंजय ताकमोगे,सुरज भिस्ते, सोनू कुरडे, सौरभ थोपटे, नवनाथ पाटणस आदी उपस्थित होते.
ब्लड सेंटरचे वैद्यकीय अधिकारी म्हणून अंजली यांनी काम पाहिले. एपी ग्रुप अध्यक्ष अच्युत काका पाटील म्हणाले सध्या रक्ताचा तुटवडा भासत आहे. साथीचे रोग आले आहेत. आता सध्या रक्ताची गरज निर्माण झाली आहे. म्हणूनच हे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपल्या रक्तापासून एखाद्याचा जीव वाचू शकतो असे ते म्हणाले.