‘उजनी’च्या पाण्यात मोटार जोडण्यासाठी गेलेल्या रामवाडी येथील युवकाचा बुडून मृत्यू…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : उजनीच्या पाण्यात मोटार सोडण्यासाठी गेलेल्या 18 वर्षांच्या युवकाचे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (ता.29) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास रामवाडी (ता.करमाळा) येथे घडली आहे. या घटनेने रामवाडी व परिसरात शोककळा पसरली आहे.

यात हकीकत अशी कि, सध्या पुणे शहर व जिल्ह्यात पाऊस झाल्याने या पावसाचे पाणी उजनी जलाशयात येत आहे, हेच पाणी आल्याने आपल्या शेतीसाठी पाणी घेण्याकरिता उजनीतील मोटार पाण्यात सोडण्यासाठी रामवाडी (ता.करमाळा) येथील युवक ऋषिकेश बाळासाहेब वारकड (वय 18) हा गेला होता, नदीमध्ये पाणी वाढल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने ऋषिकेश पाण्यात ओढला गेला व पाण्याच्या प्रवाहात तो पाण्यात बुडला त्याला वाचविण्यासाठी जवळील नागरिकांनी प्रयत्न करून त्याला बाहेर काढले व त्याला तातडीने उपचारासाठी भिगवण येथे खासगी रुग्णालयात नेले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

ऋषिकेश वारकड याने नुकतीच बारावीची परीक्षा दिलेली होती व निकालही लागला होता, ऋषिकेश च्या मागे परिवारात त्याचा लहान भाऊ व आई असा परिवार आहे, करमाळा तालुक्यात मागील आठवड्यात कुगाव व झरे येथील असे सहा जणांचा उजनी जलाशयात बोट उलटून बुडून मृत्यू झालेला होता, त्यात आज ही घटना घडल्यामुळे रामवाडी व तालुक्यात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!