साहेबराव दुर्गुळे यांचे अपघाती निधन.. - Saptahik Sandesh

साहेबराव दुर्गुळे यांचे अपघाती निधन..


करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा,ता.29 : करमाळा न्यायालयात वकीलांचे क्लार्क असलेले साहेबराव महादेव दुर्गुळे (वय- 62) यांचे आज (ता.29) सांयकाळी साडेआठच्या सुमारास झरे फाटा (ता.करमाळा) येथे मोटरसायकल अपघातात निधन झाले आहे तर त्यांच्या पत्नी कल्पना दुर्गुळे या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत.

श्री.दुर्गुळे हे जेऊरहुन करमाळ्याकडे येत असताना त्यांच्या मोटरसायकलचा झरे फाट्याजवळ अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागल्याने ते जागीच ठार झाले आहे तर त्यांच्या पत्नी कल्पना यांचा हात या अपघातात मोडला आहे. या अपघातात साहेबराव यांना तातडीने उपचारासाठी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचार करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. श्री दुर्गुळे हे पूर्वी कै.ॲड.एम एन कटारे यांचे क्लार्क म्हणून कार्यरत होते. त्यानंतर स्वतःच न्यायालयात वकिलांचे क्लार्क म्हणून कार्यरत होते, अनेक पक्षकारांना मदत करत होते. त्यांच्या अपघाती निधनामुळे करमाळा वकील संघाने दुखवटा व्यक्त केला आहे. श्री दुर्गुळे यांच्या मागे पत्नी,दोन मुली जावई नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!