राज्यस्तरीय केळी परिषदेचे 31 ‘मे’ रोजी कंदर येथे आयोजन..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : केळी उत्पादक संघाच्या वतीने 31 मे रोजी कंदर (ता.करमाळा) येथे राज्यस्तरीय केळी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी केळी उत्पादक शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार असून, शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन संघाचे अध्यक्ष किरण चव्हाण यांनी केले आहे.
31 मे 2024 रोजी सकाळी अकरा वाजता श्री सद्गुरू सांस्कृतिक भवन कंदर (ता.करमाळा) या ठिकाणी होणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते होणार असून, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इकोचे संचालक विनोद तराळ हे राहणार आहेत, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष अतुल माने पाटील भुषवणार आहेत.
यावेळी केळी शेतीचे वास्तव अवकाळी पाऊस, गारा, वाढते तापमान, C. M. V. व्हायरस, बोगस औषधे, माती मिश्रित निंबोळी पेंड, विमा कंपन्यांची मुजोरी आणि व्यापाऱ्यांनी चालवलेली शेतकऱ्यांची पिळवणूक अशा अनेक कारणामुळे केळी उत्पादक शेतकरी खचला आहे या विषयावर या परिषदेत मंथन होऊन यासंबंधी ठराव करण्यात येणार आहेत.
याशिवाय निर्यातक्षम केळी उत्पादन, प्लांनटेशन ते हार्वेटिंग, याविषयी निर्याततज्ञ माननीय अझर पठाण करणार आहेत. या माहीतीचा लाभ राज्यातील ज्यास्तीत ज्यास्त केळी उत्पादक शेतकरी बांधवांनी घ्यावा आणि केळी परिषदेला उपस्थित रहावे असे आवाहन केळी उत्पादक शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष किरण भाऊ चव्हाण यांच्यासह उपाध्यक्ष डॉ. राहुल बच्छाव पाटील, जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत भांगे, करमाळा तालुकाध्यक्ष वैभव पोळ यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष यांनी केले आहे.