परतीच्या पडलेल्या पावसावर रब्बीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम परिसरात पावसाने दडी मारल्याने खरीपाचा हंगाम वाया गेला. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. दुष्काळा पडतो काय अशी चिंता बळीराजाला वाटू लागली परंतु परतीकच्या पावसाने पावसावर काळया आईची ओटी भरायची म्हणून महागा मोलाचे बी आणून पेरणी केली पेरायला औत मिळत नाही.
एकरी औताला दोन हजार भाडे आहे तर ट्रॅक्टरला एकरी एक हजार रुपये भाडे आहे. अलिकडे पशुधन कमी झाले त्यामुळे औत मिळतं नाही, म्हणून शेतकरी ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी करतो. परंतू अजुनही जाणते शेतकरी बैलाने पेरणी करतात. ट्रॅक्टरने पेरणी केल्यानंतर शेत कडक बनते त्यामुळे पिक साधत नाही. औताने पेरणी केलेले बी चांगले उगवते सध्या बागायतदार भागांत ज्वारी चे पिके घेत नाहीत कारण ज्वारीच्या पिकाला मेहनत घ्यावी लागते. एक तर ज्वारी काढायला मजुर मिळतं नाही सहाशे रूपये हाजेरी देउन मजुर मिळतं नाही त्यामुळे ज्वारी पेरत नाही हि ज्वारी डा.य भागात शेतकरी करतात ज्वारी चे पिक कमी झाल्याने ज्वारी ला आता सोन्याचा भाव आला आहे साडे. सहा हजार रुपये क्विंटल ला भाव आला आहे अजून केम,निंभोरे परिसरात ज्वारीचे पिक म़ोठया प्रमाणात घेतले जाते. केम निंभोरे परिसरातील ज्वारीला चांगली मागणी आता पडलेल्या एवढ्या पावसावर हे पिक येत नाही अजून दोन म़ोठया पावसाची गरज आहे असे जाणकार शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. आता शेतकऱ्यांचे डोळे निसर्गाकडे लागले आहेत.
मी वर्षानुवर्षे कोणत्याही पिकांची पेरणी ट्रॅक्टरने न करता बैलाच्या साहाय्याने करत आलो आहे. ट्रॅक्टरने पेरणी केल्यावर शेत कडक बनते पीक नीट ऊगवत नाही. माझ्या आर्थिक अडचणीमुळे मला बैल विकायची पाळी आली पण मी भाडयाने औतानेच पेरणी करून घेतली
– मिठू सुरवसे, शेतकरी, केम