अहिल्यादेवींचे कार्य भावी पिढीसाठी प्रेरणादायी– प्रा.रामदास झोळ


केम (संजय जाधव) – भारताचा वारसा, संस्कृती सामर्थ्य समृद्ध करण्यात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे खूप मोठे योगदान लाभले असून सुशासन, मंदिरांचा जिर्णोद्धार महिला सक्षमीकरण आदर्श राज्य कारभाराचे कार्य भावी पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा रामदास झोळसर यांनी व्यक्त केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त गुलमोहरवाडी ता.करमाळा येथे समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रा शिवाजीराव बंडगर पंचायत समितीचे माजी सभापती पै अतुल पाटील, उदयसिंह पाटील,बहुजन संघर्ष समितीचे अध्यक्ष राजाभाऊ कदम सरपंच संतोष बाबर, विनोद बाबर, कानतोडे सर,वाघमोडे सर यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना प्रा.झोळ यांनी सांगितले की अहिल्यादेवी होळकर यांनी ज्याप्रमाणे काम केले त्यांचा आदर्श घेऊन आपण काम करणे गरजेचे आहे आज आपण करमाळा तालुक्याची परिस्थिती पाहता उजनी धरण 61 टक्के भरले असताना सुद्धा पाण्यासाठी सर्वसामान्य जनतेला वणवण करावी लागत आहे . प्रशासनामार्फत तालुक्यात ४५ टँकर चालू असून त्यांची यंत्रणा तोकडी पडत असल्याने प्राध्यापक रामदास झोळसर फाउंडेशन च्या वतीने करमाळा तालुक्यामध्ये गाव गावात पाणी देण्याची व्यवस्था केली जात आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. धनगर मराठा मुस्लिम समाजाला आरक्षण शिक्षणासाठी मिळणे आवश्यक असून निदान शिक्षणासाठी सवलत मिळणे गरजेचे आहे कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. 

धनगर समाजाच्या आरक्षणाला न्यायालयामध्ये आव्हान दिलं जाईल त्यापेक्षा सध्या आपल्याला त्यांच्या सवलती घेता येऊ शकतात का असा विषय महादेव जानकर व माझ्यात २०१९ ला आमच्या दोघांमध्ये झाला. त्यांनी फडणवीस साहेबांशी चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला आरक्षण देता नाही आलं तर सवलती मिळाल्या पाहिजे अशी मागणी केली. सदर मागणीनंतर आदिवासी समाजाला ज्या दहा सवलती आहेत त्या धनगर समाजाला 2019 च्या जीआरच्या माध्यमातून देण्यात आल्या. धनगर समाजातील मुलामुलींनी सवलतींचा फायदा घेऊन उच्च शिक्षण घेतले पाहिजे असे देखील मत प्रा.झोळ यांनी यावेळी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!