वरकुटे येथील अनुदानित शाळा शिक्षका अभावी बंद पडण्याची शक्यता - Saptahik Sandesh

वरकुटे येथील अनुदानित शाळा शिक्षका अभावी बंद पडण्याची शक्यता

केम (संजय जाधव) – करमाळा  तालुक्यातील वरकुटे येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयातील शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत मात्र त्यांच्या जागी नवीन शिक्षक भरती झाली नाही आणि शासनाने  शिक्षक दिले नाहित त्यामुळे आज या शाळेची अवस्था तीन वर्ग (८ वी ते १० वी ईयत्ता) एक शिक्षक अशी झाली आहे. १५ जुन पासून शाळा भरणार आहे‌ त्यापूर्वी या शाळेला शिक्षक उपलब्ध करून दिले तरच हि शाळा टिकणार आहे अन्यथा एक अनुदानित शाळा शिक्षका अभावी बंद करण्याची वेळ येऊ शकते.

वरकुटे हे करमाळा तालुक्यातील करमाळा व माढा तालुक्याच्या सिमेवर आहे. येथे ८ वी ते १० वी चे वर्ग आहेत.  येथे शिक्षक नसल्याने विद्यार्थी इतरत्र जाऊ शकतात आणि विद्यार्थी कमी झाले म्हणून हि शाळा बंद पडू शकते या ठिकाणी शिक्षक येणार नाहित त्यामुळे मोठ्या कष्टातून उभे केलेले ज्ञान मंदिर बंद होण्याची भिती हि शाळा सुरळीतपणे  सुरू राहावी यासाठी शिक्षक व पालक धडपड करीत आहेत या शाळेची स्थापना १९८४ साली झाली. या शाळेत एकूण ८ वी ते१० वी असे तीन वर्ग होते. या संस्थेन गावातील जि.प.शाळा बंद पडू नये म्हणून  संस्थेने पाचवी ते सातवी वर्ग काढले नाहित.

शाळेच्या सुरूवातीपासून बागवान एस.ए.व  दास डि,डि रोपळे  दिरंगे एस.एल. पवार,एस यू गोडसे जे एस या शिक्षकांनी या विनाअनुदानित शाळेसाठी रात्रदिवस काम  करून हे ज्ञान मंदिर उभे केले ८ वी ते १० वीच्या वर्गासाठी पाच शिक्षक व पाच शिक्षकेतर  कर्मचारी वृंद होता. शाळेचा परिसर सुंदर असा आहे. एक लॅब अशा या शाळेत गुण्या गोविंदाने विध्याथीं शिक्षण घेतात या शाळेतील  शिक्षक वरचेवर सेवा निवृत्त झाल्याने येथे  नवीन शिक्षकच नाहित त्यामुळे शाळा अडचणीत आली आहे.

शिक्षकांची मागणी करूनही या शाळेला शिक्षक दिले नाहित पाच शिक्षकी शाळा दोन शिक्षिका झाली. ३१ मे २०२४ रोजी त्यातील एक शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत.  त्यामुळे आता तीन वर्गावर एक शिक्षक राहिले आहेत. त्यामुळे या शिक्षकाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

अनुदानित शाळेबाबतीत शासनाची उदासीनता हि शैक्षणिक समस्या बनली याचाच एक बळी म्हणजे सरस्वती विद्यालय ठरू नये यासाठी शिक्षक भारती संघटना प्रयत्नशील आहे. अनुदानित शाळा टिकवून समाजाला मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची असताना या शाळेमध्ये शिक्षक उपलब्ध न करून दिल्याने शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे याला शासनच जबाबदार राहिलं

विजयकुमार गुंड, जिल्हा शिक्षक भारती संघटना,

संबंधित लेख – १००% अनुदानित शाळा बंद होतेय..

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!