घारगाव मध्ये अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात संपन्न
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – मौजे घारगाव तालुका करमाळा या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांची 299 जयंती उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ग्रामपंचायत कार्यालय घारगाव या ठिकाणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला व मूर्तीला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी गावातील युवकांनी आपले विचार, मनोगत व्यक्त केले. यामध्ये सर्वधर्मसमभावाचे आचरण करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
यावेळी विद्यमान सरपंच सौ आशाबाई रामलिंग देशमुखे उपसरपंच दत्तात्रेय मस्तूद व ग्रामपंचायत सदस्य सतीश बापू पवार ,सौ. लक्ष्मी संजय सरवदे,सौ.लोचना काकू पाटील, सौ अनिता भोसले, सौ कविता होगले,व तसेच रामलिंग अण्णा देशमुखे, रमेश होगले, नामदेव होगले, बबन बारस्कर सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. जयंतीच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.