पोफळजचे पवार-पाटील यांचा अमृतमहोत्सव वाढदिवस उत्साहात संपन्न – मान्यवरांची उपस्थिती
करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.4 : पोफळज ( ता.करमाळा) येथील प्रा.दत्तात्रय पवार पाटील (सर) यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित नुकताच संपन्न झाला आहे. झरे येथील राधेश्याम मंगल कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार सौ. तृप्ती पाटील या होत्या तर प्रमुख पाहुणे. ॲड.डॉ. बाबूराव हिरडे हे उपस्थित होते.
प्रा. दत्तात्रय पवार-पाटील यांनी आयुष्यभर ज्ञानदान तर केलेच पण अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सुखाचे पर्व निर्माण होईल असे त्यांना घडवले. आपल्या मुलांनाही उच्चशिक्षित केले डाॅ. प्रणव व डाॅ. प्रमोद हे वडिलांच्या विचाराचा वारसा सांभाळत सर्वसामान्यांची सेवा करत आहेत. पवार-पाटील सर 75 रीत असलेतरी त्यांनी सांभाळलेले आरोग्य पहाता यापुढेही ते सामाजिक क्षेत्रात योगदान देतील व त्यांनी ते द्यावे.
– ॲड. डाॅ. बाबूराव हिरडे
या कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी, हिंदी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम सादर झाला.तर कार्यक्रमाचा शुभारंभ प्रार्थना करून करण्यात आला, डॉ. प्रणव पवार पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते व अध्यक्षाच्या हस्ते पवार पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. ७५ दिवे लाऊन सुवासिनींनी औक्षण केले. सदर प्रसंगी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने पवार पाटील सरांना मानपत्र प्रदान करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. बाबुराव हिरडे यांनी ‘अभिनंदन’ या अमृतमहोत्सवी वाढदिवस विशेषांकाचे प्रकाशन केले.
यावेळी कु. अस्मिता बारकुल, माजी प्राचार्य अंकुशराव चव्हाण, प्रा. सुभाष दळवी, डॉ. प्रमोद पवार-पाटील यांची भाषणे झाली. त्यानंतर सत्कारमूर्ती प्रा. पवार पाटील यांनी उपस्थितांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमिच्या अध्यक्षा तहसीलदार तृप्ती पाटील यांनी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले. पवार पाटील कुटुंबीयांनी कृतज्ञतेच्या भावनेतून केलेला हा गौरव समारंभ समाजासाठी अनुकरणीय व आदर्श ठरेल असे मत व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी जी.प. सदस्य उमेश पाटील, बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर, आदिनाथचे माजी कार्यकारी संचालक एच.बी. डांगे, ॲड.मस्के, उदय मोरे-पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य बबनराव साळुंके , तरटगावचे सरपंच डाॅ. अमोल घाडगे, माजी कृषी अधिकारी दिगंबर साळुंके, भाजपा युवा नेते अमर साळुंके, मारूतीराव पवार, शिक्षक संभाजी लोंढे पोफळज शाळेचे मुख्याध्यापक व त्यांचे सहकारी याशिवाय माजी विध्यार्थी, शिक्षक, मित्रपरिवार, नातेवाईक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉ. प्रमोद पवार पाटील यांनी आभार मानले.