संजय हंडे यांनी पूर्णवेळ समाजकार्यात उतरावे – गणेश करे-पाटील

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : येथील अंधश्रध्दा निर्मुलन, ग्राहक पंचायत व व्यसनमुक्तीचे कार्यकर्ते संजय हंडे हे एस. टी. च्या सेवेतून निवृत्त होत असलेतरी त्यांनी आपल्या कामाची दिशा बदलून समाजकारणात पूर्णवेळ कार्यरत रहावे; असे आवाहन यशकल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील यांनी केले.
श्री. हंडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित केलेल्या सत्कार समारंभाच्या सोहळ्यात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ. ॲड. बाबूराव हिरडे हे होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून ग्राहक पंचायतचे राज्य शाखेचे सदस्य भालचंद्र पाठक, अंधश्रध्दा निर्मुलनचे नगर जिल्हा सचिव व्ही. आर. गायकवाड हे उपस्थित होते. पुढे बोलताना करे-पाटील म्हणाले, की श्री. हंडे यांनी नोकरी करतानाही समाजकारणात वेळ दिला आहे. यापुढे नोकरीचा ताण नसल्यामुळे पूर्णवेळ समाजकारणासाठी द्यावे. त्यातून खऱ्या अर्थाने समाजाला न्याय मिळेल.
यावेळी श्री. पाठक सर, व्ही. आर. गायकवाड यांची भाषणे झाली. सत्काराला उत्तर श्री. हंडे यांनी दिले. यावेळी डॉ. महेश अभंग, सचिन साखरे, ॲड. शशिकांत नरूटे, श्रीधर पाटील, भिमराव कांबळे, पत्रकार अशपाक सय्यद, मुख्याध्यापक गभाले, दिगंबरराव देशमुख, उमेश आगरवाल, राजूशेठ वासानी, कल्याणराव पाटील, राजू साने, शिवाजी वीर, अनिल माने, शिक्षक संतोष माने, संजय मोरे, दिलीप क्षीरसागर, प्रकाश आडसुळ, सुनील चव्हाण, कल्याणराव पाटील, ज्योतीताई पांढरे, श्रीमती महाजन आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन भिष्माचार्य चांदणे यांनी केले.
श्री.हंडे हे प्रत्येक क्षेत्रात हिरिरीने काम करतात. आजपर्यंत त्यांनी आपली एस.टी.ची सेवा अतिशय उत्साहात व प्रवाशांना दिलासा देणारी केली आहे. याचवेळी प्रवाशातील अंधश्रध्दा दूर करणे, व्यसनमुक्तीचे धडे देणे व ग्राहकांना जागरूक करणे अशी कामे केली. यावेळी एस. टीची जबाबदारी नसल्याने हीच कामे त्यांनी गती देऊन करावीत. तसेच शहरातील मरगळेली सामाजिक चळवळ उभारण्यात त्यांनी योगदान द्यावे – ॲड. डॉ. बाबूराव हिरडे


