डॉ.अनिल सांगळे यांना “कार्यसम्राट” हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
पुणे (संदेश प्रतिनिधी) : सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक डॉ.अनिल सांगळे यांना मुंबई येथील “प्रितगंध फाऊंडेशन” या संस्थेच्या सातव्या वर्धापन दिनी मान्यवरांच्या हस्ते “कार्यसम्राट” हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.संतोष महाडेश्वर तसेच प्रमुख पाहुणे उद्घाटक एलीट मिसेस क्वीन ऑफ द वर्ल्ड आणि मिसेस इंडिया युनिव्हर्स विजेत्या डाॅ.सोनाली वनमाळी, कवयित्री,शिक्षणतज्ञ,कौन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट डाॅ.अलका नाईक, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.संतोष तावडे, इतिहास संशोधक डॉ. शीतलताई मालुसरे इ. मान्यवर यावेळी उपस्थित होते.
भारतातील सन्माननीय समाज शास्रज्ञ, लेखक,राष्ट्रीय समाज भूषण तथा मार्गदर्शक अशा सर्वांगीन सर्वोत्कृष्ठ समाजकार्यात अमुल्य व अतुलनीय कामगिरी करणा-या विविध क्षेत्रातील प्रतिभासंपन्न व्यक्तीनां हा अतिशय प्रतिष्ठीत समजला जाणारा “कार्यसम्राट पुरस्कार देण्यात येतो.
डॉ. सांगळे हे संगमनेर (जिल्हा अहमदनगर) येथील आहेत. डॉ. सांगळे यांनी आजपर्यंत साहित्यातून समाजप्रबोधन केले आहे तसेच गोरगरिबांना संकटकाळी अन्न धान्य वाटप करणे,रुग्णांची मदत करणे.व्यसनाच्या आहारी गेलेल्यांना व्यसनमुक्त करणे, वृक्षारोपण, समाजातील हुंडाबंदी करणे.आदी सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
सन्मानपत्र ,शाॕल , सन्मानचिन्ह,असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली.