पोस्को मधील संशयितास जामीन मंजूर – बार्शी येथील न्यायालयाचा आदेश..
करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा (ता.4) : करमाळा शहरातील रहिवासी असलेला पोस्को मधील संशयित आरोपी सनी जगताप यास बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाधीश जे.सी.जगदाळे यांनी जामीन मंजूर केला आहे.
सनी जगताप यांने अज्ञान मुलीस लग्न करण्याच्या उद्देशाने बाहेर गावी नेले होते. त्या मुलीच्या पालकांनी त्याच्या विरूध्द मुलीला पळवून नेलेबाबत व नंतर विनयभंगाची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलीसांनी गुन्हा दाखल करून श्री.जगताप यास अटक केली होती.
त्यानंतर ॲड.प्रियाल अग्रवाल, ॲड.राकेश देशमुख व ॲड. व्ही.डी.सुर्वे यांनी बार्शी येथील अतिरिक्तसत्र न्यायाधीश जे.सी. जगदाळे यांचे समोर जामीन अर्ज केला होता. काही अटीसह 15000 रूपयेचा जामीन मंजूर केला आहे.