करमाळ्यात दिव्यांगांचा जल्लोष - दिव्यांग मंत्रालय झाल्याबद्दल पेढे वाटून केला आनंद व्यक्त.. - Saptahik Sandesh

करमाळ्यात दिव्यांगांचा जल्लोष – दिव्यांग मंत्रालय झाल्याबद्दल पेढे वाटून केला आनंद व्यक्त..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : दिव्यांग महामंडळ स्थापन करून गेली तीस ते चाळीस वर्षाची दिव्यांगांची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केली असून, महाराष्ट्रातील संपूर्ण दिव्यांग मतदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचा दावा करमाळा दिव्यांग सेनेचे अध्यक्ष बबन आरणे यांनी केला

दिव्यांग महामंडळ स्थापन झाल्याबद्दल करमाळा येथील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षात दिव्यांग जल्लोष मिळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, दिव्यांग चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारी बबनराव आरणे, समीर बागवान, उदय मामा सोनके माने या दिव्यांगांचा मानचिन्ह फेटा देऊन सत्कार करण्यात आला.

करमाळा मूकबधिर शाळेतील दिव्यांग मुलांना नवीन ड्रेस, कॅडबरी व गोड जेवण देवून दिव्यांग महामंडळाचा आनंद साजरा करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे उपजिल्हा प्रमुख अनिल पाटील युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे शहर प्रमुख संजय शीलवंत युवा सेना तालुका अध्यक्ष राहुल कानगुडे शहर प्रमुख विशाल गायकवाड उपशहर प्रमुख नागेश गुरव तालुका समन्वयक नागेश चेंडगे वस्ताद अजिनाथ कोळेकर ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर प्रमोद बनसोडे संजय जगताप रंभापुरा शाखाप्रमुख निलेश चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग महामंडळाची स्थापना करून खऱ्या अर्थाने दिव्यांगाला स्वाभिमानाने आधार दिला आहे, प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी गेली वीस पंचवीस वर्षापासून उठाव केला होता, कुठच्याही सरकारने हा धाडसी निर्णय घेतला नाही, मात्र एकनाथ शिंदे हा निर्णय घेऊन खऱ्या अर्थाने दिव्यांगांच्या जीवनात एक नवीन आशा ऊर्जा चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, यामुळे आज सर्व दिव्यांगांना घेऊन दिव्यांगांचा जल्लोष मिळावा घेण्यात आला. – महेश चिवटे

कर्णबधीरांना आता उपचारासाठी तीन लाख रुपये मिळणार..!

लहान मुलांच्या कर्णदोषासाठी शस्त्रक्रिया करण्यासाठी पंचवीस हजार रुपये अनुदान देण्यात येत होते आताही अनुदानाची मर्यादा तीन लाख पर्यंत करण्यात आल्यामुळे अनेक कर्णबधिर लहान मुलांचे ऑपरेशन होऊन त्यांना ऐकू येईल अशा विश्वास मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटील यांनी व्यक्त केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!