उंदरगावमध्ये जनावरांचे लसीकरण शिबीर संपन्न - Saptahik Sandesh

उंदरगावमध्ये जनावरांचे लसीकरण शिबीर संपन्न

करमाळा (दि.२३) : येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा  राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर व उंदरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे उंदरगाव ता करमाळा जि.सोलापूर येथे श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये विविध शेळ्या, मेंढ्या व जनावरांचे मोठया प्रमाणात लसीकरण कऱण्यात आले.

पीपीआर (PPR ) ही  लस 150देण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी डॉ. मनीष यादव पशुवैद्यकीय अधिकारी पंचायत समिती करमाळा व त्यांची टीम  डॉ. झोळ(सहाय्यक पशु वैद्यकीय अधिकारी) , डॉ. गणेश बाबर, डॉ. राहुल जवळ, डॉ.दत्तात्रेय वाघमारे व गावचे सरपंच श्री.युवराज मगर,उपसरंपच श्री. शिवाजी  कोकरे व इतर गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .तसेच राष्ट्रीय सेवा योजना + स्तर सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा.लक्ष्मण राख , सौ. प्रा. सुजाता भोरे , प्रा. राहूल श्रीरामे,प्रा.संजय पाटील, प्रा. मनोहर धिंदळे, प्रा. रोकडे व( NSS ) एन.एस. एसचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!