नीळवस्ती शाळेस दोन संगणक टेबल भेट

करमाळा(दि.२३) : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून घोटी येथील जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विष्णू हरिदास ननवरे यांनी जि प प्रा शाळा नीळवस्ती शाळेस दोन संगणक टेबल भेट दिले आहेत. विष्णू ननवरे हे पुणे येथील नामांकित कंपनीत उच्च पदावर साॅफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.

स्वतः ग्रामीण भागात शिक्षण घेतले याची जाणीव असल्याने व त्यानंतर पुणे येथे आयटी कंपनीत नोकरी करीत असल्याची जाण मनात ठेवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक क्षेत्रातील ज्ञान मिळावे त्याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून त्यांनी शाळेस संगणक टेबल भेट दिले त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती जि प प्रा शाळा नीळवस्ती व ग्रामस्थ निमगाव ह शाळेचे मुख्याध्यापक श्री तात्यासाहेब जाधव, श्री मनोज दराडे यांनी आभार व्यक्त केले.






