काॅपीमुक्त परिक्षेसाठी दुसऱ्या शाळेचे शिक्षक असणार पर्यवेक्षक - Saptahik Sandesh

काॅपीमुक्त परिक्षेसाठी दुसऱ्या शाळेचे शिक्षक असणार पर्यवेक्षक

संग्रहित छायाचित्र

केम(संजय जाधव) :  इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नवा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक व  केंद्र संचालक दुसऱ्या शाळा महाविद्यालयातील असणार आहेत पाच ते सात किलोमीटर परिसरातील शाळांमधील शिक्षक विविध परीक्षा केंद्रावर परीक्षक असतील वेळप्रसंगी जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळेमधील शिक्षकांच्याही मदत घेतली जाणार आहे.

बोर्डाने मागील वर्षी कॉपीमुक्त परीक्षेसाठी सरमिसळ पद्धतीचा अवलंब केला होता. त्यानुसार एका परीक्षा केंद्रावर पाच किलोमीटर अंतरावरील विविध शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी बसविले मात्र परीक्षा केंद्र वरील बहुतेक पर्यवेक्षक त्याच शाळेतील असल्याने कॉपी प्रकाराला पूर्ण आळा बसला नसल्याचे दिसून आले. शालेय शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे बंधन घातले आहे. मात्र अजूनही बऱ्याच शाळेमध्ये सीसीटीव्ही नाही किंवा ते नावालाच असल्याची वस्तूस्थिती आहे. विद्यार्थी जेईई, नीट परीक्षेचे तयारीसाठी शहरात खाजगी कोचिंग क्लासेस जातात. प्रवेशित महाविद्यालयामध्ये ते जातच नाहीत ते फक्त परीक्षेलाच जातात अशी वस्तूस्थिती आहे.  या पार्श्वभूमीवर बोर्डाने आता कॉफी मुक्त परीक्षेसाठी प्रत्येक केंद्र वरील पर्यवेक्षक केंद्र संचालक बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

कॉपीमुक्त परीक्षेसाठी आता ज्या शाळा कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा केंद्र आहे तेथील शिक्षक त्याच केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून नेमले जाणार नाहीत. एका केंद्रावरील शिक्षक दुसरे केंद्रावर परीक्षक म्हणून नेमले जाणार आहेत. काही ठिकाणी एकच केंद्र असल्याने त्या केंद्रावर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक परीक्षक म्हणून नेमण्याचे नियोजन आहे. केंद्र संचालकही दुसऱ्या शाळेत असतील.
औदुंबर उकिरडे, सचिव पुणे विभागीय मंडळ पुणे

चालू वर्षी पुणे बोर्डाने काॅपीमुक्त परिक्षा होण्यासाठी सुरू केलेला नवा पॅटर्नचे स्वागतार्ह आहे. या पॅटर्नमुळे परीक्षेत होणाऱ्या काॅपीला आळा बसण्यास मदत होईल व प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थींना न्याय मिळेल.
 ● प्रविण मखरे, केम ता,करमाळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!