उमरड येथील प्राथमिक शाळेत माता मेळावा व हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न - Saptahik Sandesh

उमरड येथील प्राथमिक शाळेत माता मेळावा व हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न

करमाळा(दि.२२) : निपूण भारत अंतर्गत व आनंददायी शनिवार उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरड या शाळेत माता मेळावा व हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता.

या उपक्रमाचे उद्घाटन सरपंच मनिषाताई बदे यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली श्रीवास्तव, मोमीन, गयाबाई सुभाष बदे, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या प्रियांका पडवळे, सीमा बदे,भारती पाखरे, हिना पठाण, संजीवनी कोंडलकर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून सांख्यिकी विभाग जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी अधिकारी पदावर नियुक्त झालेल्या कुमारी स्नेहल सुभाष बदे अर्थ व  व कृषी सहाय्यक सुप्रिया शरद बदे यांचा सन्मान करण्यात आला. 

यावेळी अंजली श्रीवास्तव यांचे व्याख्यान झाले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या सर्व्हायकल कैंसर वर सहजपणे तपासणी उपाय योजना आणि प्रतिबंध खूप महत्त्वाचा आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कैंसर यावर उपाय योजना म्हणून सरकारने वैक्सीन उपलब्ध करून ठोस पावले उचलली आहेत. तसेच खाजगी रुग्णालयात ही हे वैक्सीन उपलब्ध आहे. यासंदर्भात प्रत्येक महिलेने जागरूक असणे गरजेचे आहे. एचपीव्ही हे वैक्सीन वयाच्या ९ वर्षापासून आपण घेऊ शकतो.  येणाऱ्या काळात गर्भाशयाच्या मुखाचा कैंसरवर मात करु शकतो. तपासणी कधीं कधीं करावी, लक्षणे काय,यावर महिलांच्या आरोग्य संदर्भात ही त्यांनी मार्गदर्शन केले.

व्याख्यानाच्या कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व मातांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला व हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करून सर्व मातांना वाण वाटप करण्यात आले.

यावेळी नायब तहसीलदार सुभाष बदे माजी सरपंच प्रमोद बदे मकाईचे संचालक बापूसाहेब चोरमले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय काका कोठावळे पोलीस पाटील अंकुश कोठावळे माजी सरपंच संदीप मारकड उपाध्यक्ष रवींद्र गिरी जनार्दन मारकड चांगदेव चौधरी उपसरपंच समाधान वलटे उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील महिला शिक्षिका मेघना साळुंखे मुख्याध्यापक अंकुश अमृळे दिलीप भोसले बापूसाहेब भोसले संदीप ढाकणे मुकुंद राऊत अनिल यादव यांनी परिश्रम घेतले या उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी जयवंत नलावडे साहेब विस्तार अधिकारी मिनीनाथ टकले, केंद्रप्रमुख अमृत सोनवणे यांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!