एमपीएससी परीक्षेत शेलगाव येथील आण्णासाहेब बेरे यांचा राज्यात चौदावा क्रमांक – उद्योग निरीक्षक पदी निवड
Annasaheb Bere from Shelgaon ranked fourteenth in the state in the MPSC examination – Selection for the post of Industry Inspector
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एम.पी.एस.सी) सप्टेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत करमाळा तालुक्यातील शेलगाव (वांगी) येथील आण्णासाहेब शामराव बेरे यांची उद्योग निरीक्षक पदी राज्यात 14 व्या क्रमांकावर निवड झाली आहे.
आण्णासाहेब बेरे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलगाव (वांगी) येथे झाले. माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय कर्जत येथे झाले तर पुणे येथील सिंहगड कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट येथून त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली.
त्यांच्या या निवडीनंतर शिवशंभो प्रतिष्ठान, शेलगाव (वांगी) कडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच करमाळा तालुक्यातील मित्र परिवाराकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
माझ्या या यशामागे माझी आजी, आई-वडील, भाऊ मित्र परीवार यांचा मोठा वाटा आहे. तसेच गावचे सरपंच अमर (दादा) ठोंबरे, माजी सरपंच बाळासाहेब बेरे, नायब तहसीलदार प्रशांत खताळ यांचे देखील वेळोवेळी मार्गदर्शन मिळत गेले असे आण्णासाहेब बेरे यांनी यावेळी सांगितले.