जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेतुन केममधील खेळाडूंची पुणे येथील विभागीय स्पर्धेसाठी निवड - Saptahik Sandesh

जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेतुन केममधील खेळाडूंची पुणे येथील विभागीय स्पर्धेसाठी निवड

केम खेळाडू

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) : पंढरपूर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत केम येथील प्राची राजेंद्र तळेकर,अमृता मोहन काळे, सिद्धी सचिन तळेकर,प्रिया पप्पू चेंडगे या खेळाडूंनी धावणे, लांब उडी, भालाफेक,थाळीफेक अशा विविध खेळात यश मिळविले. त्यानंतर त्यांची पुणे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

प्राची राजेंद्र तळेकर 19 वर्ष वयोगटांमध्ये 400 मीटर धावणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच तिने लांब उडी याही स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला आहे.कुमारी अमृता मोहन काळे 17 वर्ष वयोगटांमध्ये भाला फेक या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
या दोन्ही विद्यार्थिनी केम येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिकत असून त्यांना क्रिडा शिक्षक दादा अवताडे यांचे मार्गदर्शन लाभले.

केम येथीलच सिद्धी तळेकर हिने १७ वर्षे वयोगटात २२.७० मीटर थाळीफेक करत प्रथम क्रमांक मिळविला. प्रिया चेंडगे हिने १४ वर्षे वयोगटात २०.१८ मीटर थाळीफेक करत प्रथम क्रमांक मिळविला.
या दोन्ही विद्यार्थिनी केम येथील राजाभाऊ तळेकर विद्यालयात शिकत आहेत.या विद्यार्थिनींना केम येथील स्वराज्य रक्षक मर्दानी खेळाचे प्रशिक्षक अक्षय तळेकर यांनी मार्गदर्शन केले.या सर्व खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे नूतन विद्यालयाच्या संस्थेचे चेअरमन सुदर्शन तळेकर,सचिव भाऊसाहेब बिचीतकर प्राचार्य अर्जुन रणदिवे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी
त्याचप्रमाणे राजाभाऊ तळेकर विद्यालयाच्या संस्थेचे उपाध्यक्ष महेश तळेकर, मुख्याध्यापक विनोद तळेकर, शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर मुख्याध्यापक नागनाथ तळेकर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थिनींचे केम परिसरातून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!