देवळाली येथील शेरेवस्तीला आ.शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून रस्ता मिळाला : आशिष गायकवाड -

देवळाली येथील शेरेवस्तीला आ.शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून रस्ता मिळाला : आशिष गायकवाड

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : देवळाली (ता.करमाळा) येथील शेरेवस्ती येथे जवळपास 700 ते 800 लोकसंख्या असून, या वस्तीला गावातून जाण्या – येण्यासाठी अधिकृत रस्ता स्वातंत्र्यपूर्व काळापासून नव्हता, परंतु देवळालीचे माजी सरपंच आशिष गायकवाड व ग्रामपंचायत टीमच्या प्रयत्नातून वनविभागाच्या विविध अटी, शर्ती पूर्ण करून हा रस्ता पूर्ण करण्याचा मानस हाती घेतला होता. अखेर या रस्त्याचे काम सुरू झाले असून ८ दिवसांमध्ये सदर रस्ता ग्रामस्थांना जाण्या-येण्यासाठी हस्तांतरित करण्यात येणार आहे. यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व प्रयत्नामुळे हा रस्ता यशस्वी झाला असल्याचे माजी सरपंच आशिष गायकवाड यांनी सांगितले.

हा रस्ता पूर्ण करण्यासाठी ४ वर्षापासून पाठपुरावा चालू होता.आ.संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून जिल्हा वनाधिकारी धैर्यशील पाटील व त्यांच्या टीमने विशेष सहकार्य केले. ग्रामपंचायत देवळालीच्या वतीने वेळोवेळी वनाधिकारी सोलापूर ,वनविभाग मोहोळ, वनविभाग भोर, करमाळा तहसील कार्यालय ,प्रांताधिकारी कार्यालय कुर्डुवाडी या ठिकाणी पाठपुरावा केला त्याचे फलित मिळाले आहे.

या रस्त्याचे काम चालू झाल्यानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी सरपंच प्रतिनिधी धनंजय शिंदे, माजी सरपंच गहिनीनाथ गणेशकर, उपसरपंच प्रतिनिधी रामचंद्र कानगुडे ,चेअरमन रामचंद्र रायकर,ग्रा.प.सदस्य पोपट बोराडे, प्रकाश कानगुडे, संजय चौधरी त्याचबरोबर चेअरमन संजय कानगुडे, बापू गुंड, बंडु काका शेळके यांनी विशेष प्रयत्न केले. शेरेवस्ती, देवळाली ग्रामस्थांमधून आमदार संजयमामा शिंदे, माजी सरपंच आशिष गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!